Friday, October 29, 2010

समांतर

समांतर
म्हणजे 'parallel'....शाळेत असताना गणिताच्या पुस्तकात समांतर रेषांचा धडा होता.

गणित हा तसा माझा नावडता विषय - दहावीचा गणिताचा पेपर दिल्यावर आयुष्यात गणिताकडे पाठ फिरवायची नाही असा मी पण केला होता..पण हा धडा मात्र एकदम लक्षात राहिला..

गणिताच्या बाईंनी फळ्यावर दोन रेषा काढल्या आणि म्हणाल्या 'ह्या आहेत समांतर रेषा, ज्या कधीच एक मेकांना छेदत नाहीत'. Two lines in a plane that do not intersect or meet are called parallel lines.
इतर वेळेस तासाला झोप काढणारी मी एकदम जागी झाले आणि डोक्यात काहीतरी वेगळेच विचार चालू झाले. या रेषा छेदत नाहीत? एकमेकांना कधीच भेटत नाहीत? समोरच्या फळ्यावर माझी नजर खिळलेली होती आणि वाटला, काय होईल जर मी ह्या दोन तोकड्या रेषा वाढवत नेल्या? फाल्याबाहेरून भिंतीवर? भितीवरून सरकत सरकत खिडकीबाहेर....बाहेरच्या झाडावरून पलीकडे दूर डोंगर दिसतोय तिथपर्यंत?तरीही त्या नाही का भेटणार? तास संपल्यावर मला लक्षात आला कि कितीही काही केला तरी हा नियम आहे कि त्या नाही भेटणार एकमेकांना....

आयुष्यातल्या काही नाती पण अशीच समांतर रेशांसारखी होत जातात...काही नात्यांना आपण समांतर होण्या साठी सोडून देतो ...तर काही नाती गुंफायची इच्छा असूनही समांतर होतात......सुरवातीला एकाच बिंदू पासून सुरु झालेली नाती नकळत विरुद्ध दिशांना वळतात...
वेळीच जर काही केल नाही तर ती कधी समांतर झाली हे सुद्धा काळात नाही..असं कुठल्याही नात्यात होऊ शकतं, हो कि नाही?

No comments:

Post a Comment